Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता अॅपद्वारे ऑनलाईन मिळेल कडकनाथ

Webdunia
मध्यप्रदेश सरकारने दुर्लभ चिकन प्रजाती 'कडकनाथ' बाजारात प्रस्तुत करण्यासाठी एक मोबाइल ऍप्लिकेशन तयार केले आहे. सरकार झाबुआ आदिवासी भागात आढळणार्‍या कडकनाथ कोंबडीची वाढत असलेली मागणी बघत नॉनव्हेज शौकीन लोकांसाठी आता अॅपद्वारे याला उपलब्ध करवेल. शिवराज सरकारच्या सहकारिता राज्य मंत्री विश्वास सारंग यांनी MP KADAKNATH मोबाइल अॅप लाँच केला आहे.
 
या प्रसंगी त्यांनी म्हटले की सहकारितेने अंत्योदय योजनेत सहकारी समिती नियुक्त करून नोकरी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले गेले आहेत. या शृंखलेत कडकनाथ कुक्कुट पालन व विक्री संबंधित सहकारी समितींसाठी 'मध्यप्रदेश कडकनाथ मोबाइल अॅप' सुरू केले जात आहे.
 
सारंग यांनी म्हटले की उपभोक्ता आणि व्यापारी अॅपच्या माध्यमातून समितींपर्यंत पोहचू शकतात. अॅपद्वारे समितीनं असे प्लॅटफॉर्म उपलब्ध करवण्यात येत आहे ज्याने त्यांना आधुनिक बाजारची सुविधा मिळू शकेल.
 
सारंग यांनी म्हटले की कडकनाथ प्रजातीचा कोंबडा इतर प्रजातींच्या कोंबड्यापेक्षा उत्तम असतो. यात प्रोटीनची मात्रा अधिक आणि फॅट्स कमी प्रमाणात आढळतात. यात व्हिटॅमिन-बी-1, बी-2, बी-6, बी-12, सी, इ, नियासिन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि  हिमोग्लोबिन भरपूर प्रमाणात आढळतं. हे इतर कोंबड्यांच्या तुलनेत फायदेशीर आहे. याचे रक्त, हाडं आणि संपूर्ण शरीर काळं असतं. हे केवळ मध्यप्रदेशच्या झाबुआ आणि अलीराजपूर येथे आढळतात.
 
राज्य मंत्री यांनी सांगितले की झाबुआ, अलीराजपूर आणि देवास जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालनाची 21 सहकारी समितीची नोंदणी झाली आहेत. याचे 430 सदस्य आहे. चार समितीने व्यवसाय सुरू केले आहे. अॅपच्या माध्यमातून कोणीही कडकनाथ कोंबडा खरेदी करण्यासाठी ऑनलाईन डिमांड करू शकतं. भविष्यात ऑनलाईन आर्डरसह होम डिलेव्हरी सुविधाही उपलब्ध करवण्यात येईल.
 
अलीकडेच कडकनाथावर मध्यप्रदेश आणि छत्तिसगढ यांच्यात वाद निर्माण झाला असून दोन्ही राज्यांनी याच्या जातीवर आपला दावा केला होता. दोन्ही राज्यांनी या काळ्या पंख असलेल्या चिकन साठी 'जीआय टेग' हेतू चेन्नईच्या भौगोलिक संकेतक नोंदणी कार्यालयात आवेदन केले होते.
 
मध्य प्रदेश पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त उप निदेशक डॉ भगवान मंगहानी यांनी म्हटले होते की प्रदेशाला काळा पक्ष्यासाठी जीआय टेग प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यांनी म्हटले की ग्राम विकास ट्रस्ट ऑफ झाबुआने 2012 मध्ये कडकनाथ प्रजननामध्ये सामील आदिवासी कुटुंबांकडून जीआय टॅगसाठी आवेदन केले होते. डॉ. मंगनानी यांनी म्हटले की राज्य द्वारा संचलित हॅचरी दरवर्षी विभिन्न प्रकाराचे 2.5 लाख कोंबड्यांचे उत्पादन करते.
 
मध्यप्रदेशने झाबुआमध्ये 1978 मध्ये चिकनच्या या प्रजातीसाठी पहिले पोल्ट्री स्थापित केले होते, परंतू छत्तिसगढाने आपल्या उत्पादनामध्ये एका अवधीत उत्कृष्ट प्रदर्शन केले होते.
 
एक खासगी कंपनी ग्लोबल बिझनेस इनक्यूबेटर प्रायव्हेट लिमिटेड (जीबीआयपीएल) चे अध्यक्ष श्रीनिवास गोगिनेनी यांनी म्हटले होते की छत्तिसगढाच्या दंतेवाडा जिल्ह्यात घरगुती वातावरणात एक वेगळ्या प्रकारे पक्षी पालन केले गेले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments