Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ चे रिलीज होणार नाही

Webdunia
देशातील  मल्टिप्लेक्स असोसिएशनने  राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ सिनेमा पदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील 75 टक्के मल्टिप्लेक्स मालक हे मल्टिप्लेक्स असोसिएशनचे सदस्य आहेत. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘पद्मावत’ सिनेमाला होत असलेल्या तीव्र विरोधानंतर आणि हिंसक पद्धतीने केलेल्या निषेधानंतर असोसिएशनने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
 
मल्टिप्लेक्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक अशेर यांनी बोलताना सांगितले, “राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यातील असोसिएशनच्या स्थानिक व्यवस्थापनाने आम्हाला कळवले आहे की, कायदा आणि सुव्यवस्था ठीक वाटत नाही. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित करणार नाही.” “आमच्यासाठी संरक्षण महत्त्वाचे असते. ज्यावेळी या चारही राज्यातील कायदा-सुव्यवस्था सिनेमा प्रदर्शनासाठी ठीक वाटेल, त्यानंतर प्रदर्शित करु असे सांगितले . 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments