PhD on PM Modi: बनारस हिंदू विद्यापीठाच्या (BHU) राज्यशास्त्र विभागाच्या संशोधक विद्यार्थिनी नजमा परवीनने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पीएचडी पूर्ण केली आहे. कथा सम्राट मुन्शी प्रेमचंद यांच्या गाव लम्ही येथील रहिवासी असलेल्या नजमा परवीन यांनी 2014 मध्ये प्रोफेसर संजय श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली 'नरेंद्र मोदींचे राजकीय नेतृत्व: एक विश्लेषणात्मक अभ्यास' या विषयावर संशोधन सुरू केले. सुमारे नऊ वर्षांत त्यांनी संशोधन पूर्ण केले.
यासोबत पंतप्रधान मोदींवर संशोधन करणारी ती देशातील पहिली मुस्लिम महिला ठरली आहे . नजमा परवीन यांचे संशोधन पाच प्रकरणांमध्ये आहे.या मध्ये काँग्रेसची सत्ता त्यांच्या घराणेशाहीतून मुक्तता, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजकीय जीवन, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे केलेले कार्य, जनता आणि माध्यमांचा मिळालेला पाठिंबा, विरोधकांकडून त्यांच्यावर लावलेले आरोप आणि टीकांचा काळ, आरएसएस संघाशी जुडल्यामुळे मुस्लिम समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन इत्यादी आहे.
नजमा म्हणतात की, संशोधन अभ्यासासाठी मला राजकारणी निवडायचे होते, म्हणून पंतप्रधान मोदींची निवड केली. या संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाकडून टीका झाली किंवा त्यांना लक्ष्य केले गेले तरी काही फरक पडत नाही. धर्माच्या दृष्टीकोनातून काहीही पाहू नये.
नजमा म्हणाल्या की, पीएम मोदींच्या व्यक्तिमत्त्वाला महत्त्व दिले पाहिजे. नरेंद्र मोदी हे कोणत्याही विशिष्ट धर्माचे किंवा जातीचे नसून संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. संपूर्ण देशाला सोबत घेऊन पुढे जाण्याचे काम त्यांनी केले आहे.