यंदाही मागील वर्षी प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या आईकडे न जाता सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. यामुळे सैन्यात पुन्हा जोश निर्माण झाला आहे. यावेळी मोदी किन्नौरमधील सुमडोमध्ये आयटीबीपी, जवान आणि डोग्रा स्काऊटसोबत उपस्थित होते..
कुणालाही या दौरा कुठे असेल याची संपूर्ण माहिती देण्यात आली नाही. यावेळी पंतप्रधान मोदी आणि जवानांनी एकमेकांना मिठाई दिली आहे. तर देशवासीयांची शुभेच्छा दिल्या आहेत. जवळपास एक तास पंतप्रधान मोदी जवानांसोबत होते. त्यांच्याशी मोदींनी संवाद साधला आहे.
या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगो गावातील लोकांशीही संवाद साधला. हे गाव सुमडोच्या अगदी जवळच आहे. नरेंद्र मोदी चीन सीमेवर जातील असा कयास होता मात्र दौरा गुप्त असल्याने फक्त अंदाज आळवले जात होते. यावेळी मोदिनी सैनिकान आपण आणि देश तुमच्या सोबत आहोत असा विश्वास केला आहे.