Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान मोदी 12 फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर

modi trump
, मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 (10:05 IST)
Prime Minister Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहे. ट्रम्प यांच्या ऐतिहासिक व्हाईट हाऊसमध्ये पुनरागमनानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा असेल.  
ALSO READ: सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले, गडचिरोलीमध्ये 4 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले
मिळालेल्या माहितनुसार यापूर्वी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल फोनवरून अभिनंदन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारीपासून दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार आणि संरक्षण यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करतील.  
ALSO READ: "आत्मपरीक्षण करा, महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही", देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना सल्ला
मिळालेल्या माहितीनुसार मोदी पॅरिसचा दोन दिवसांचा दौरा संपवल्यानंतर वॉशिंग्टन डीसीला जातील. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अमेरिकेची राजधानी येथे पोहोचतील आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या आणि ट्रम्प यांच्यात चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या काळात ट्रम्प स्वतः पंतप्रधान मोदींसाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन करू शकतात.

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Cancer Day 2025 : जागतिक कर्करोग दिन कधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या या आजाराविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टी