Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 25 May 2025
webdunia

म्यानमार सीमेवर दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद

national 4 assam rifles
, गुरूवार, 30 जुलै 2020 (16:34 IST)
भारताच्या म्यानमारजवळील सीमेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार आसाम रायफलचे जवान शहीद झाले आहेत. तर या दहशतवादी हल्ल्यात इतर चार जवान जखमी झाले आहेत. हा हल्ला पिपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) केले आहे. 
 
म्यानमारजवळील सीमेवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आसाम जवानांवर गोळीबार करण्यात आला. इंफाळपासून सुमारे १०० किमीच्या अंतरावर असलेल्या चंदेल जिल्ह्यात हा हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय लष्कराकडून या भागात अतिरेक्यांना शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या बरोबरच भारत आणि म्यानमार सीमेवर देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अयोध्या: राम मंदिराचे पुजारी आणि 16 पोलिसकर्मी कोरोना पॉझिटिव्ह, पंतप्रधान मोदी 5 ऑगस्टला शिलान्यास करतील