Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवज्योत सिंह सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा

Webdunia
मंगळवार, 15 मे 2018 (15:38 IST)
पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री आणि भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे.  तर केवळ मारहाणीप्रकरणी दोषी ठरवलं. यामुळे त्यांचा तुरुंगवास होणार आहे.
 
रोडरेज प्रकरण हे 27 डिसेंबर 1988 मधलं आहे.  यात पतियाला मध्ये   65 वर्षीय गुरनाम सिंह यांना रस्त्यावर मारहाण केली होती. यानंतर गुरनाम सिंह यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना पटियालाच्या सत्र न्यायालयाने 22 सप्टेंबर, 1999 रोजी सिद्धू आणि त्यांचे सहकारी रुपिंदर सिंह संधू यांची पुराव्याअभावी सुटका केली होती. पण पीडिताच्या कुटुंबियांनी या निर्णयाविरोधात पंजाब आणि हरियाणा कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने सिद्धू यांना भारतीय दंडविधान कलम 304 अंतर्गत दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments