Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाणबुडीची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी CBI ने नौदलाच्या कमांडरसह 5 जणांना अटक केली

Webdunia
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (21:21 IST)
भारतीय नौदलाच्या किलो वर्ग पाणबुडीची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी सीबीआयने नौदलाच्या कमांडरसह पाच जणांना अटक केली आहे. त्यांना मुंबईत अटक करण्यात आली आहे. सीबीआयने गेल्या महिन्यात एक गुप्त कारवाई सुरू केली होती ज्यात दोन सेवानिवृत्त नौदल कर्मचारी आणि अधिकारी व  इतर अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते, अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. 
 
 या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, मुंबई, हैदराबादसह १९ ठिकाणांचा शोध घेतला आहे, जेथून तपास यंत्रणेला अनेक महत्त्वाची कागदपत्रे तसेच डिजिटल स्वरूपात पुरावे मिळाले आहेत. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
 किलो वर्ग पाणबुडीच्या सध्या सुरू असलेल्या आधुनिकीकरण प्रकल्पाबाबत कमांडरने दोन निवृत्त अधिकाऱ्यांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केल्याचा आरोप आहे. अधिका-याने सांगितले की भ्रष्टाचाराच्या संवेदनशील आणि उच्च-प्रोफाइल प्रकरणांशी संबंधित एजन्सीच्या लाचलुचपत प्रतिबंधक युनिटला या संदर्भात माहिती लीक शोधण्याचे काम देण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई सुरू झाली.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments