Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

NEET PG परीक्षा 2022 पुढे ढकलली

NEET PG exam 2022 postponed NEET PG परीक्षा 2022 पुढे ढकललीMarathi National News  In Webdunia Marathi
, शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (16:02 IST)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NEET PG परीक्षा 2022 6-8 आठवड्यांनी पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार होती. NEET PG परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. खरंच, एका याचिकेत राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET) PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या एका गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही मागणी केली आहे. परीक्षा आयोजित करण्याच्या नवीन तारखांचे मंत्रालय आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळाची समिती 6-8 आठवड्यांनंतर पुनरावलोकन करेल आणि निर्णय घेईल. 
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचिकेत दावा केला होता की अनेक एमबीबीएस पदवीधर विद्यार्थी अनिवार्य इंटर्नशिप कालावधी पूर्ण न केल्यामुळे मार्च 2022 च्या NEET परीक्षेला बसू शकणार नाहीत.तसेच मागील वर्षाची 2021 ची नीट काउंसलींग तारख्या या वर्षाच्या परीक्षेच्या दरम्यान येत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बृहन्मुम्बई अर्थसंकल्प 2022-23 संदर्भात विविध क्षेत्रातील तज्ञांचे मत काय आहे?