Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

इनरनेट क्षेत्रात नवी क्रांती, इस्रोकडून जीसॅट-३० चे यशस्वी प्रक्षेपण

इनरनेट क्षेत्रात नवी क्रांती, इस्रोकडून जीसॅट-३० चे यशस्वी प्रक्षेपण
इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक यशस्वी कामगिरी केली आहे. जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून यशस्वी प्रेक्षेपण केले आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजून ३५ मिनिटांनी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. GSAT-30 या उपग्रहामुळे इनरनेट क्षेत्रात नवी क्रांती  होणार आहे.व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकितही वर्तवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.
 
GSAT-30 या उपग्रहाचं वजन सुमारे ३,१०० किलो आहे. लॉन्चिंगपासून १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. या उपग्रहामध्ये दोन सोलर पॅनल आणि बॅटरी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनेक बॉम्बस्फोटातील आरोपी, दहशतवादी जलीस फरार