Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दंतेवाडा-विजापूर सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, नऊ माओवादी ठार

Naxal encounter
, मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (15:12 IST)
छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि बिजापूरच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत जवानांनी 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळावरुन नक्षलवाद्यांच्या मृतदेहाजवळून शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. 
 
पश्चिम बस्तर विभागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांचे संयुक्त पथक शोधमोहिमेवर निघाले. आज 3 सप्टेंबर रोजी पहाटे जवान  आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला. 

या चकमकीत नऊ माओवादी ठार झाले आहे. नक्षलवादी जंगल परिसरात लपलेले आहे. अशी माहिती मिळाल्यावर दंतेवाडा आणि विजापूर जिल्हा पोलिसांनी सुरक्षा दलासह कारवाई केली असून चकमक सुरु आहे. मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जखमी झाले आहे. त्यांची माहिती गोळा करत आहे. 
 Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गळफास लावून व्हिडिओ बनवून केली तरुणाने आत्महत्या, म्हणाला मित्रांनो लग्न करू नका!