Marathi Biodata Maker

गोव्यात निपाह विषाणूचा संशयित रुग्ण सापडला

Webdunia
सोमवार, 28 मे 2018 (17:24 IST)
गोव्यात निपाह विषाणूचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे. त्याच्याविषयी संशय असल्याने त्याला बांबोळीतील गोमेकॉ अर्थात गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात  दाखल करण्यात आलं आहे. हा निपाह विषाणूचाच रुग्ण असल्याचं वैद्यकीयदृष्ट्या अद्याप सिद्ध झालेलं नाही. पण  हा रुग्ण केरळमधून गोव्यात रेल्वेने आला होता. हा रुग्ण गोमंतकीयच आहे. निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या केरळमधील भागाला या रुग्णाने मुळीच भेट दिली नव्हती. त्याला स्वत:ला संशय आल्यानंतर त्याने गोमेकॉत धाव घेतली. त्याच्या रक्ताचे नमूने पुणे येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येतील.

केरळमध्ये सुट्टी घालवण्यासाठी बरीच गोमंतकीय कुटुंबं गेली आहेत. त्यापैकी कुणाला निपाह विषाणूची लागण झाल्याचं उदाहरण समोर आलेले नाही. मात्र  आता प्रथमच संशयित रुग्ण सापडल्याने गोवा प्रशासनही सतर्क झाले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments