Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नोएडा : 2600 हून अधिक बनावट कंपन्या, 15000 कोटींचा घोटाळा

Webdunia
शुक्रवार, 2 जून 2023 (17:50 IST)
भारतातील फरारी उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांना मागे टाकत आता दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये सुमारे 15 हजार कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. पॅन कार्ड डेटा आणि हजारो लोकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा नोएडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने शेल कंपन्या तयार करून देशभरात सरकारी तिजोरीचे नुकसान केले. नोएडा पोलिसांनी या प्रकरणी किंगपिनसह आठ जणांना अटक केली आहे. 
 
आरोपी दिल्ली-गाझियाबादमध्ये तीन ठिकाणी कार्यालये उघडून फसवणूक करत होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार केलेल्या 2600 हून अधिक कंपन्यांची यादीही आरोपींकडून मिळाली आहे. पोलिसांनी सूत्रधार दीपक मुर्जानी, विनिता, अश्वनी, यासीन, आकाश सैनी, राजीव, अतुल आणि विशाल यांना दिल्लीतून अटक केली आहे.
 
तपासात आठ हजार लोकांच्या पॅन तपशीलासह इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या टोळीने पाच वर्षात सरकारला सुमारे 15 हजार कोटींचा महसूल बुडवला आहे. 
 
ही टोळी बनावट कंपनी आणि बनावट जीएसटी क्रमांकाच्या आधारे जीएसटी रिफंड घेत असे. मार्चमध्ये आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांच्या तीन पथकांनी तपास करून टोळीचे हे प्रकरण उघडकीस केले.
 
ही टोळी 2660 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून देशभरात फसवणूक करत होती. टोळीतील आठ आरोपींकडून आठ लाख लोकांच्या पॅनकार्ड तपशिलांसह बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. एका चार्टर्ड अकाउंटंटला (सीए) पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पश्चिम बंगाल, दिल्ली, गाझियाबाद आणि चंदीगड येथे छापे टाकले.
 
Edited by - Priya Dixit   
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चतुर्थीला चंद्र दिसला नाही तर या 3 प्रकारे व्रत सोडा ! धार्मिक नियम जाणून घ्या

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वंध्यत्व आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो !

साखरेपेक्षा गुळ चांगला का आहे? त्याचे 5 सर्वोत्तम फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

पुढील लेख
Show comments