Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मोबाइल चार्जिंगला लावताच स्फोट, तरूणीचा मृत्यू

मोबाइल चार्जिंगला लावताच स्फोट, तरूणीचा मृत्यू
नोकियाचा ५२३३ क्रमांकाचा मोबाइल एका १९ वर्षीय मुलीने चार्जिंगला लावला. मोबाइल चार्जिंगला लावताच या फोनचा स्फोट झाला. या स्फोटात या तरूणीचा मृत्यू झाला. उमा ओरम असे या मुलीचे नाव होते. ओदिशामध्ये ही घटना घडली आहे. फोन चार्जिंगला लावला त्यावेळी ही मुलगी फोनवर आपल्या नातेवाईकांशी बोलत होती. मोबाइल फोनचा स्फोट झाल्याने या मुलीचा चेहेरा छिन्नविछिन्न झाला, तसेच तिचा पायही जखमी झाला. या मुलीला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ओदिशातील खेरियाकानी भागात ही धक्कादायक घटना घडली.
 
या मुलीच्या भावाने नेमके काय घडले ते सांगितले. माझ्या बहिणीने तिचा नोकिया फोन चार्जिंगला लावला आणि ती बोलत होती. अचानक या मोबाइलचा स्फोट झला. काही कळण्याच्या आतच उमा जागीच चक्कर येऊन पडली. तिला तातडीने रूग्णालयात नेले पण तिथेच तिचा मृत्यू झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज बब्बर यांचा उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा