November Bank Holiday: रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर महिन्यासाठी जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या महिन्यात बँका 10 दिवस बंद राहणार आहेत. या काळात बँकेच्या शाखांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही, त्यामुळे या सुट्ट्यांची यादी लक्षात घेऊन बँकिंगशी संबंधित कामाचे वेळापत्रक करणे महत्त्वाचे आहे. नोव्हेंबर महिन्यात देशातील अनेक राज्यांतील बँक शाखा 10 दिवस बंद राहतील. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांचा समावेश आहे.नोव्हेंबर महिन्यासाठी बँक हॉलिडेची यादी जारी केली आहे. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये 1, 8, 11 आणि 13 नोव्हेंबरला बँकांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर 6, 12, 13, 20, 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी दुसरा-चौथा शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबरमध्ये प्रादेशिक सुट्ट्यांमुळे बँका चार दिवस बंद राहतील. या चार दिवसांमध्ये नानक जयंती, कन्नड राज्योत्सव, सेंग कुत्सानेम आणि कनकदास जयंती आणि वांगला उत्सव या सुट्ट्यांचा समावेश आहे. या सणांमुळे संबंधित राज्यातील बँक शाखांमधील कामकाज बंद राहणार आहे. तथापि, नोव्हेंबर महिन्यातील या सुट्ट्यांमध्ये बँकांच्या ऑनलाइन आणि UPI सेवा 24 तास कार्यरत राहणार आहे.