Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Omicron: कोरोनाच्या नवीन व्हेरियंट साठी 1 डिसेंबरपासून लागू होणार नवीन नियम, आंतरराष्ट्रीय उड्डाणे बाधित होऊ शकतात

Omicron: कोरोनाच्या नवीन व्हेरियंट साठी 1 डिसेंबरपासून लागू होणार नवीन नियम, आंतरराष्ट्रीय उड्डाणे बाधित होऊ शकतात
, सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (10:09 IST)
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटशी लढण्यासाठी सरकारने सतर्कता वाढवली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 1 डिसेंबरपासून प्रवास सुरू करण्यापूर्वी एअर सुविधा पोर्टलवर निगेटिव्ह RT-PCR अहवाल अपलोड करावा लागेल. गेल्या 14 दिवसांच्या प्रवासाचा तपशीलही द्यावा लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  ही मार्गदर्शकतत्वे जारी केली.
आता धोकादायक देशांमधून भारतात येताच त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. अहवाल येईपर्यंत त्यांना विमानतळावर थांबवण्यात येईल. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना सात दिवस घरी किंवा कुठेही विलगीकरणात राहावे लागेल. आठव्या दिवशी पुन्हा चाचणी होईल. यामध्येही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास पुढील सात दिवस स्वत:वर लक्ष ठेवावे लागेल. 
इतर देशांतून येणाऱ्यांना विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल, मात्र त्यांना 14 दिवस स्वत:चे निरीक्षण करावे लागेल, लक्षणे आढळल्यास त्यांना प्रशासनाला कळवावे लागेल. या देशांतील फ्लाइट्सच्या 5 टक्के प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाईल. पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना Omicron व्हेरियंट बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज महत्त्वाची बैठक, शाळा सुरू होणार की नवीन निर्बंध लादणार?