Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अवंतीपोरा चकमकीत एक दहशतवादी ठार

One terrorist killed in Avantipora encounter अवंतीपोरा चकमकीत एक दहशतवादी ठार Marathi National News  In Webdunia Marathi
, रविवार, 12 डिसेंबर 2021 (15:59 IST)
जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. काश्मीर पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांना अवंतीपोराच्या बारागाम भागात दहशतवादी लपल्याची बातमी मिळाली, त्यानंतर पोलीस आणि लष्कर तिथे पोहोचले, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनी चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. 
यापूर्वी, नुकतेच जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथील गुलशन चौकात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यात मोहम्मद सुलतान आणि फयाज अहमद जखमी झाले आहेत. यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रजनीकांत यांनी बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा 'जय महाराष्ट्र' केलं होतं..