मध्य प्रदेशातील टिमरनी रेल्वे स्थानकावर हा अनोखा प्रकार दिसून आला. येथे लोकांना दुसऱ्या ट्रॅकवर ट्रेन ढकलत घेऊ जावे लागले. दरम्यान, कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. ही घटना इटारसी-हरदा दरम्यान येणाऱ्या टिमरनी स्थानकाजवळ घडली. टिमरनी स्थानक पश्चिम-मध्य रेल्वे झोनच्या भोपाळ विभागात येते. या कामासाठी 40 हून अधिक लोकांची मदत घ्यावी लागली होती. खरं तर, टिमरनी स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅक आणि इलेक्ट्रिक लाईनची देखभाल करणारी टॉवर वॅगन शनिवारी दुपारी 1:30 च्या सुमारास अचानक बिघडली. वॅगन फक्त पुढे जात होती. काही तांत्रिक बिघाडामुळे ती परत येत नसल्याने चांगलीच अडचण निर्माण झाली होती. दरम्यान, 01062 पवन एक्स्प्रेसही 1.45 वाजता इटारसीहून ट्रॅकवर आली. ती गाडी एक किलोमीटर अंतरावर दूर उभी केली गेली. त्यानंतर तारांबळ उडाल्यानंतर घाईघाईत मालगाडीत माल घेऊन जाणाऱ्या मजुरांना बोलावून वॅगनला ढकलून रुळावरून काढण्यात आले. दुपारी 4.45 नंतर पवन एक्स्प्रेस रवाना होऊ शकली.A technical fault with a tower wagon at Harda led to a heartbreaking sight - people forced to manually push the wagon from the main line to another track @ndtv @ndtvindia pic.twitter.com/WQTO0xhfEx
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) August 29, 2021