Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PM Kisan Yojana : PM किसान योजनेच्या 14व्या हप्त्याच्या हस्तांतरणाची तारीख जाहीर

pm-kisan-samman-nidhi
, रविवार, 16 जुलै 2023 (17:42 IST)
पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्याची  अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे . पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्याची तारीख सरकारने जाहीर केली आहे. 28 जुलै रोजी देशातील 8.5 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता हस्तांतरित करण्यासाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये बटण दाबून पंतप्रधान मोदी स्वत: ऑनलाइन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवतील. या कार्यक्रमात शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
 
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी 28 जुलै रोजी देशभरातील 8.5 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता जारी करतील. थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT द्वारे दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील.
 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना किंवा पीएम किसान अंतर्गत, सरकार सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात ठराविक अंतराने तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये देते. हे पैसे थेट शेतEdited by - Priya Dixit  कऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे वर्ग केले जातात. या योजनेच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना थेट मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे फेब्रुवारी 2019 मध्ये लाँच करण्यात आले.
 
पीएम किसान योजनेत नोंदणी त्यांच्या अधिकृत वेबसाइट वर 'किसान कॉर्नर' ला भेट देऊन ऑनलाइन केली जाऊ शकते . यासोबतच तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे तुम्ही येथे तपासू शकता.
 
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्या जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीसह eKYC असणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते NPCI लिंक्ड असावे. 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फोटो काढण्याच्या नादात मुलीच्या डोळ्या देखत महिला समुद्रात वाहून गेली