Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान मोदी मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय बनले

Mauritius
, मंगळवार, 11 मार्च 2025 (21:05 IST)
मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. भारत आणि मॉरिशसमधील संबंध मजबूत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना देण्यात आला आहे. हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय आहेत. पंतप्रधान मोदींना दुसऱ्या देशाने दिलेला हा 21 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. 
रामगुलाम म्हणाले की, मोदी हे या प्रतिष्ठित सन्मानाने सन्मानित होणारे पाचवे परदेशी नागरिक आहेत.सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले, मॉरिशसच्या पंतप्रधानांनी नुकतेच घोषणा केली आहे की ते मला त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित करतील. तुमचा निर्णय मी नम्रतेने स्वीकारू इच्छितो. 
भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, जेव्हा जेव्हा मी मॉरिशसमध्ये येतो तेव्हा मला माझ्याच लोकांमध्ये असल्यासारखे वाटते. पंतप्रधान म्हणाले की, भारत आणि मॉरिशसमधील संबंध सौहार्दपूर्ण झाले आहेत. मॉरिशसच्या नागरिकांना त्यांच्या राष्ट्रीय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी दुपारी त्यांनी मॉरिशसचे अध्यक्ष धरम गोखूल यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी राष्ट्रपती धरम यांना गंगाजल आणि त्यांच्या पत्नीला बनारसी साडी भेट दिली. मॉरिशसच्या पंतप्रधानांनी त्यांना देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान केला.
ALSO READ: महाराष्ट्रात जीबीएसचे 224 रुग्ण आढळले, 12 मृत्यू, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांचा खुलासा
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भोजपुरी भाषेत केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, एकेकाळी बिहार हे जगाच्या समृद्धीचे केंद्र होते. आता आपण बिहारचे वैभव पुन्हा परत आणण्यासाठी एकत्र काम करत आहोत.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लाडकी बहिणीं'च्या हप्त्यावरून महाविकास आघाडी कडून महायुती सरकारवर विश्वासघाताचा आरोप