Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

PM Modi flies in Tejas मोदींनी उड्डाण केलेल्या तेजसची खासियत थक्क करेल

modi in tejas
PM Modi flies in Tejas पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केले. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत या लढाऊ विमानाची निर्मिती भारतात करण्यात आली आहे.
 
त्यांनी X वरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज तेजसमध्ये उड्डाण करताना मी अभिमानाने सांगू शकतो की, आमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे आम्ही स्वावलंबनाच्या क्षेत्रात जगात कोणाहीपेक्षा कमी नाही. भारतीय वायुसेना, DRDO आणि HAL तसेच सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन.
 
तेजस हे एकल-इंजिन असलेले बहु-भूमिका लढाऊ विमान आहे जे उच्च-धोक्याच्या हवाई वातावरणात कार्य करण्यास सक्षम आहे. हे 6,500 किलो वजनाचे सिंगल इंजिन असलेले हलके लढाऊ विमान आहे. त्यातील 50 टक्के घटक केवळ भारतातच बनतात.
 
या फायटर प्लेनमध्ये इस्त्रायली रडार बसवण्यात आले आहे, जे एकाच वेळी 10 टार्गेट्सचा मागोवा घेऊन हल्ला करू शकते. छोट्या धावपट्टीवरून हे टेक ऑफ करता येते आणि त्यात 6 प्रकारची क्षेपणास्त्रे, लेझर गाईडेड बॉम्ब आणि क्लस्टर शस्त्रे बसवता येतात.
 
ते एकावेळी 3000 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. 'तेजस मार्क-2' ही त्याची प्रगत आवृत्ती आहे जी 56,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर उडू शकते.
 
तेजसची रचना हवाई संरक्षण, सागरी टोपण आणि लढाऊ भूमिका पार पाडण्यासाठी करण्यात आली आहे. तेजसचा समावेश करणारी IAF ची पहिली स्क्वॉड्रन 45 क्रमांकाची स्क्वाड्रन होती - 'फ्लाइंग डॅगर्स'. मे 2020 मध्ये, 18 क्रमांकाची स्क्वाड्रन ही तेजस चालवणारी IAF ची दुसरी स्क्वाड्रन बनली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Soumya Vishwanathan Murder Case न्यायालयाने चारही दोषींना जन्मठेपेची, तर पाचव्या दोषीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली