Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान मोदी ISKCONचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त स्मारक नाणे जारी करणार आहेत

pm modi
, मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (23:14 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 125 रुपयांचे विशेष स्मारक नाणे जारी करतील आणि एका सभेला संबोधितही करतील.
 
पंतप्रधान कार्यालयानुसार, पंतप्रधान मोदी संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फ़रन्सद्वारे आयोजित या कार्यक्रमात सहभागी होतील.
 
स्वामीजींनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (इस्कॉन) ची स्थापना केली ज्याला सामान्यतः "हरे कृष्ण चळवळ" म्हणून ओळखले जाते.
 
इस्कॉनने श्रीमद्भगवद्गीता आणि इतर वैदिक साहित्याचे 89 भाषांमध्ये भाषांतर केले जे जगभरात वैदिक साहित्याच्या प्रसारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
 
स्वामीजींनी 100 हून अधिक मंदिरांची स्थापना केली आणि जगाला भक्ती योगाचा मार्ग दाखवणारे अनेक ग्रंथ लिहिले. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुढचे तीन-चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा