Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PM released Rs 525 coin पंतप्रधानांनी 525 रुपयांचे नाणे जारी केले

narendra modi
, गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (20:18 IST)
कृष्णभक्त मीराबाई यांच्या 525 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मीराबाईच्या स्मरणार्थ 525 रुपयांचे स्मरणार्थी नाणे जारी केले. हे नाणे सामान्य चलनात राहणार नाही.
 
नाणी गोळा करणारे आणि अभ्यास करणारे नाणेशास्त्रज्ञ सुधीर लुणावत यांनी सांगितले की, 525 रुपयांचे हे पहिले नाणे असेल. या विशेष नाण्याचे वजन 35 ग्रॅम असेल, जे 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, पाच टक्के निकेल आणि पाच टक्के जस्त यांच्या मिश्रणाने बनवले जाईल.
 
नाण्यांची वैशिष्ट्ये
नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाच्या खाली 525 रुपये असे लिहिले आहे. दुसऱ्या बाजूला मीराबाईचे चित्र आहे. संत मीराबाईंची 525 वी जयंती या नाण्याच्या वरच्या बाजूला हिंदीत आणि तळाशी इंग्रजीत लिहिलेली आहे. मीराबाईच्या चित्राच्या उजव्या आणि डावीकडे 1498 आणि 2023 लिहिलेले आहेत.
 
सुधीर यांनी सांगितले की, हे नाणे भारत सरकारच्या कोलकाता टकसाल ने बनवले आहे. हे नाणे सामान्य चलनात राहणार नाही. मात्र काही दिवसांनी सरकार प्रिमियम दराने लोकांना विकणार आहे. ज्याला हेरिटेज म्हणून ठेवता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Orxa Energies : 221 किमीची रेंज, 3 वर्षांची वॉरंटी, स्वस्त इलेक्ट्रिक बाइक