Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पंतप्रधान मोदी आज मुख्यमंत्र्यांची घेणार बैठक, देशातील कोविड-19 च्या परिस्थितीवर होणार चर्चा

narendra modi
, बुधवार, 27 एप्रिल 2022 (09:24 IST)
देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रकरणांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ट्विट करून ते म्हणाले की, "बुधवारी दुपारी 12 वाजता राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे."
 
 पीएमओने सांगितले की या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण प्रेझेंटेशन देतील. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू पुन्हा वाढू लागले आहेत. रविवारी मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी लोकांना कोविडशी संबंधित खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन केले होते. 
 
या बैठकीला पंतप्रधान मोदींसोबत पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे
 
मंगळवारी एकाच दिवसात देशात कोविड-19 चे 2,483 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, देशात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या 4,30,62,569 झाली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15,636 वर आली आहे..
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तंजावर मंदिरात उत्सवादरम्यान भीषण अपघात, विजेच्या धक्क्याने लहान मुलांसह 11 जणांचा मृत्यू, अनेक जखमी