पंत प्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ करतील.हा प्रकल्प प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन किंवा राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन म्हणूनही ओळखला जातो. गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी याची घोषणा केली होती. सरकारने आज सुरु केलेल्या या मोहिमेला ऐतिहासिक म्हणून संबोधले आहे आणि या अंतर्गत प्रत्येक नागरिकाकडे आरोग्य ओळखपत्र असेल.आयुष्मान भारत डिजिटल मिशन सध्या सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रायोगिक टप्प्यात राबवले जाणार आहे.
असेही म्हटले जात आहे की हे मिशन इको-सिस्टीमसाठी देखील महत्त्वपूर्ण सिद्ध होईल आणि यूपीआयने पेमेंटच्या क्षेत्रात जी भूमिका बजावली आहे तीच भूमिका बजावेल. या मिशन प्रक्षेपणावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया देखील उपस्थित राहतील. त्यांनी ट्विट केले,“हे मिशन डिजिटल आरोग्य परिस्थितीकी मध्ये माहितीची देवाणघेवाण सक्षम करण्यासाठी सहज असे ऑनलाइन व्यासपीठ तयार करेल. नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होतील. "
जन धन,आधार आणि सरकारच्या इतर डिजिटल उपक्रमांप्रमाणे, आयुष्मान भारत डिजिटल मिशन डेटा, माहितीच्या विस्तृत श्रेणीद्वारे एक ऑनलाइन व्यासपीठ तयार करेल. या मिशनद्वारे लोक आरोग्य नोंदींची देवाण घेवाण करू शकतील.