Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पंतप्रधान नरेंद्र मोदींची केरळच्या पीडितांसाठी नुकसान भरपाईची घोषणा

Landslide,Wayanad
, मंगळवार, 30 जुलै 2024 (18:19 IST)
केरळच्या वायनाड येथे झालेल्या भूस्खलनात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान मोदींनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. 

या  अपघातात आता पर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 116 जण जखमी झाले आहे. एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान बचावकार्यात गुंतले आहे. 

या अपघातावर शोक व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले" मी केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांच्याशी बोललो आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी  राज्यातील केंद्रीय मंत्री सुरेश गोपी आणि जॉर्ज कुरियन यांच्याशी चर्चा केली. तसेच या भागात मदतकार्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाठवण्यास सांगितले आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बेकायदेशीर पथ फेरीवाल्यांवर तोडगा काढण्याची गरज-मुंबई उच्च न्यायालय