Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमल्यातून लाभार्थ्यांशी संवाद साधला

Webdunia
मंगळवार, 31 मे 2022 (15:22 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमल्यातील ऐतिहासिक रिज मैदानावरून शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता जारी केला. बटन दाबून 10 कोटी शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपये जाहीर करण्यात आले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला.
 
पंतप्रधान मोदींनी लडाखच्या लाभार्थी ताशी टुंडुपशी बोलले. लडाखमध्ये पर्यटक येऊ लागले की नाही, असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला. ताशी यांनी जल जीवन मिशन आणि आवास योजनेचे फायदे सांगितले. ताशी टुंडुपनेपंतप्रधानांना सांगितले की त्यांना जल जीवन मिशन आणि पीएम आवास योजना (ग्रामीण) चा फायदा झाला आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना कोणतीही अडचण आली नाही.

बिहारमधील बांका जिल्ह्यातील ललिता देवी यांच्याशी पंतप्रधान मोदींनी चर्चा केली. उज्ज्वला योजना, गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळाल्याचे ललिता यांनी सांगितले. पूर्वी मातीच्या घरात राहायचे. पाणी टपकत होते. आता पक्के घर मिळाले. शौचालय बनवले. मला बाहेर जायला लाज वाटायची. पंतप्रधानांनी विचारले- तुम्ही मुलांना शिकवता का? त्यांनी सांगितले की, मोठी मुलगी बीएला आहे, मुलगा इंटरला आहे. 
 

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments