Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेलमध्ये कैद्याने गिळला मोबाईल

prisoner swallowed a mobile phone in jail
, सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (16:59 IST)
तुरुंगातील एका कैद्याने असा एक पराक्रम केला आहे ज्या बद्दल ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. जेलरच्या छाप्यात एक कैदी इतका घाबरला की त्याने आपला मोबाईल गिळला. त्यांची तब्येत बिघडली आणि तीव्र वेदना सुरू झाल्याने त्यांना गोपालगंज सदर रुग्णालयात दाखल करावे लागले. जेव्हा डॉक्टरांनी एक्स-रे केले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्याच्या पोटात फोन दिसला. ही घटना बिहार राज्यातील आहे.
 
सदर कैद्याला रुग्णालयात दाखल केले असता गुपित उघड झाले. कैद्याच्या एक्स-रे तपासणीत मोबाईल फोन दिसला. आता रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कुठलीही इजा न होता हा फोन थेट पोटात कसा पोहोचला याचा तपास काही वरिष्ठ डॉक्टरांची टीम करत आहे.
 
मेडिकल बोर्ड आता कैद्याची तपासणी करेल. कैद्याला उपचारासाठी पीएमसीएचमध्ये पाठवण्यात येत आहे. कैद्यासोबत घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी डॉक्टरांचे पथक गुंतले आहे. त्याचबरोबर कारागृहात मोबाईल कसा पोहोचला याचाही तपास सुरू आहे.
 
कैशेर अली नावाच्या या कैद्याच्या पराक्रमाचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. 2020 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. तो स्मॅकची तस्करी करताना पकडला गेला. हे प्रकरण समोर आल्यापासून पोलीस गोंधळात पडले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोल्हापूरला दर्शनाला निघालेल्या ३ भाविकांचा भीषण अपघातात वाटेतच मृत्यू