Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रियंका गांधींचा करिश्मा ; काँग्रेसची मते वाढणार

Webdunia
गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (10:24 IST)
काँग्रेस सरचिटणीसपदाचा कार्यभार घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच प्रियंका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्याने 'प्रियंका फॅक्टर' काँग्रेससाठी किती लाभदायी ठरतो, याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असताना एका सर्वेक्षणात प्रियंकामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मतटक्का वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून पक्षाची नव्याने बांधणी करण्याचे आव्हान प्रियंकावर असून त्यात त्या काही अंशी यशस्वी होतील, असे संकेत ताज्या सर्वेक्षणातून मिळत  आहेत.
 
इंडिया टीव्ही-सीएनएक्सने पूर्वांचलमधील 43 जागांवर हे सर्वेक्षण केले असून प्रियंकामुळे या सर्वच मतदारसंघात काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढेल, असा अंदाज वर्तवला गेला आहे. काँग्रेसची मते वाढली तरी जागांच्या बाबतीत विशेष फायदा होणार नाही. काँग्रेसला या भागात 4 जागा मिळतील, असे हे सर्वेक्षण सांगते. 43 पैकी 20 जागा एनडीएला तर 19 जागा सपा-बसपा महागठबंधनला मिळतील, असा अंदाज आहे.
 
प्रियंकामुळे काँग्रेसच्या दोन जागा वाढणार आहेत. पूर्वांचलमध्ये अमेठी, रायबरेलीसह चार जागा काँग्रेस जिंकेल. काँग्रेसचा नंबर वन प्रतिस्पर्धी भाजप असला तरी प्रियंकामुळे भाजपऐवजी सपा-बसपाच्या महागठबंधनला अधिक फटका बसेल, असा अंदाज आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments