Dharma Sangrah

भाजप लाठ्या घेऊन संसदेत येऊ शकते, प्रियांका गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Webdunia
शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (10:53 IST)
Priyanka Gandhi News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करून करोडो देशवासीयांच्या भावना दुखावल्याबद्दल भाजपने माफी मागावी अशी मागणी प्रियांका गांधी यांनी गुरुवारी केली.
ALSO READ: राहुल गांधींविरोधात FIR दाखल, दिल्ली पोलिसांनी तपास क्राईम ब्रांचकडे सोपवला
मिळालेल्या माहितीनुसार वायनाडमधील काँग्रेस लोकसभा खासदार म्हणाल्या की, विरोधी पक्षाच्या सदस्यांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी भाजप बळाचा वापर करू शकते. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की, “भाजप लाठ्या घेऊन संसदेत येऊ शकते, आम्हाला संसदेत प्रवेश करण्यापासून रोखू शकते, धक्काबुक्की करू शकते. पण मुद्दा बाबासाहेबांच्या अपमानाचा आहे. बाबासाहेबांचा अपमान करून करोडो देशवासीयांच्या भावना दुखावल्याबद्दल भाजपला माफी मागावी लागेल. आदल्या दिवशी झालेल्या धक्कबुक्कीत भाजपचे दोन खासदार जखमी झाले होते. वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाजपवर वारंवार डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप केला तसेच भाजपने देशातील करोडो दलित आणि वंचितांच्या भावनांचा अपमान केला आहे. भाजपने देशाची माफी मागावी असे देखील प्रियंका गांधी म्हणाल्या.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

पुढील लेख
Show comments