Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Punjab : कर्जाच्या बोजामुळे कंटाळून एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या

suicide
, सोमवार, 1 जानेवारी 2024 (15:55 IST)
Punjab :सरत्या वर्षाला 2023 ला निरोप देण्यासाठी  संपूर्ण जग आनंद साजरा करत होता वर्षाच्या च्या शेवटच्या दिवशी संपूर्ण जालंधर नवीन वर्षाच्या जल्लोषात मग्न असताना दारौली खुर्द गावातून एका खळबळजनक बातमीने खळबळ उडाली. पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मनमोहन सिंग यांच्या संपूर्ण कुटुंबाने आपले आयुष्य संपविण्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
 
मनमोहन सिंग (55), त्यांची पत्नी सरबजीत कौर (55), दोन मुली प्रभजोत उर्फ ​​ज्योती (32), गुरप्रीत कौर उर्फ ​​गोपी (31) आणि ज्योतीची मुलगी अमन (3) अशी मृतांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मनमोहन सिंग आणि सरबजीत कौर यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले, तर उर्वरित तीन मृतदेह बेडवर पडलेले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांनी कर्जाला कंटाळून चौघांची हत्या करून आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कर्ज आणि कौटुंबिक कलहामुळे तणाव असल्याचे लिहिले आहे.या मुळेअक्खे कुटुंब संपले. मात्र, एसएसपी मुखविंदर सिंग यांनी पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच कारणे स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.  
 
आदमपूरचे डीएसपी विजयकंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना रात्री उशिरा माहिती मिळाली की, दारौली खुर्द गावात पोस्ट ऑफिसमध्ये काम करणारे मनमोहन सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्या केली आहे.
 
मनमोहन यांचे जावई सरबजीत सिंग यांनी सांगितले की, काल पासून ते सासऱ्यांना फोन करत होते, मात्र फोन कोणी उचलले नाही. रविवारी सायंकाळी उशिरा ते स्वत: दारौली खुर्द येथे पोहोचले असता पाचही जणांचे मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. याला अधिकृतरित्या कोणीही दुजोरा दिला नसला तरी. कुटुंबाने आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
 
मनमोहन सिंग अनेक दिवसांपासून कर्जामुळे त्रस्त होते, असे शेजारचे लोक सांगतात. आदमपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ मनजीत सिंह यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीमही तपासासाठी पोहोचली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली असून, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited By- Priya DIxit   
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

New Year spcial recipe : न्यू इयर पार्टीसाठी बनवा रेस्तरॉ स्टाईल पनीर टिक्का मसाला