Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

CM भगवंत मान पुन्हा वडील झाले, पत्नी गुरप्रीतने मुलीला जन्म दिला

Bhagwant Mann Daughter
, गुरूवार, 28 मार्च 2024 (15:19 IST)
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा एकदा वडील झाले आहेत. त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्स’वरून ही माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी पत्नी गुरप्रीत कौर आणि मुलीच्या तब्येतीचीही माहिती दिली आहे.
 
'देवाने आम्हाला मुलगी दिली आहे'
पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले की, देवाने आपल्याला मुलीची भेट दिली आहे. आई आणि बाळ दोघेही निरोगी असल्याचे त्यांनी सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार भगवंत मान यांनी 26 जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते की ते वडील होणार आहेत. त्यावेळी त्यांची पत्नी 7 महिन्यांची गरोदर होती.
 
भगवंत मान यांचे गुरप्रीत कौरसोबत दुसरे लग्न
भगवंत मान यांचे दुसरे लग्न गुरप्रीत कौर यांच्याशी झाले, जिच्यापासून त्यांचे पहिले मूल झाले आहे. मान यांनी दोन वर्षांपूर्वी गुरप्रीत यांच्यासोबत लग्न केले. पहिल्या लग्नापासून त्यांना दोन मुले आहेत. दोन्ही मुले आता त्यांच्या आईसोबत अमेरिकेत राहतात.
 
कोण आहे गुरप्रीत कौर?
गुरप्रीत कौर ह्या हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्या व्यवसायाने डॉक्टर आहे. 7 जुलै 2022 रोजी त्यांनी भगवंत मान यांच्याशी लग्न केले. या लग्नाला फक्त जवळचे कुटुंबीयच उपस्थित होते. या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राघव चढ्ढा यांनीही हजेरी लावली होती.
 
भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय?
भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीचे नाव इंद्रप्रीत कौर आहे. दोघांना एक मुलगा दिलशान आणि एक मुलगी सीरत कौर आहे. मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांची दोन्ही मुलेही उपस्थित होती. मान आणि इंद्रप्रीत कौर यांचा 20 मार्च 2015 रोजी घटस्फोट झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Father Kills Son फोनवर जोरजोरात बोलण्यावरून मुलाने अडवले, वडिलांनी खून केला