Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता खरोखरची राधे मां, अश्लील नृत्य न करण्याची घेतली शप्पथ

radhe maa
वादग्रस्त राधे माँ हिला पुन्हा जुन्या आखाड्यात सामील करण्यात आले आहे. राधे माँ हिने लेखी माफी मागितली म्हणून निलंबन रद्द करण्यात आलं आहे.
 
आपलया विचित्र कृत्यांमुळे बोगस बाबांच्या यादीत सामील केलेल्या राधे मां हिला पुन्हा महामंडलेश्वर पदवी मिळाली आहे. आता राधे माँ प्रयागराज कुंभमेळ्यातील पेशवाईमध्ये सामील होऊ शकेल. कुंभमेळ्यात महामंडलेश्वर म्हणून राधे माँला जमीन आणि इतर सुविधाही देण्याचा येतील. उल्लेखनीय आहे की आखाडा परिषदेनं राधे माँसह अनेक बांबाचे नावे बोगस बाबांच्या यादीत टाकले होते.
 
राधे माँने अश्लली नृत्य केल्याची लेखी माफी मागितली आहे आणि पुन्हा असे घडणार नाही अशी शप्पथ देखील घेतली.
 
काही दिवसांपूर्वीच राधे माँचे निलंबन रद्द करणे आणि महामंडलेश्वरची पदवी परत देण्याचा निर्णय अखाड्याच्या बैठकीत घेण्यात आला होता परंतू औपचारिक घोषणा आखाड्याचे संरक्षक महंत हरि गिरि यांनी केली आहे. त्यांच्याप्रमाणे चौकशीत राधे माँ विरुद्ध गंभीर आरोप नाहीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Meizu M16T आणि Meizu M16th भारतात 5 डिसेंबर रोजी लॉन्च होणार