Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल

Webdunia
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (09:09 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, उलट त्यांच्या ह्रदयात फक्त उद्योजक असून त्यांचे भले कसे होईल हे पाहत आहे. मेहुल चोक्सी, नीरव मोदी, ललित मोदी हेच धनाढ्य लोक ‘भाई’त्यांच्या आहेत. शेतकरी, गरीब, कामगार वर्गाला कधीच ‘भाई’म्हणत नाहीत, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. 
 
जर तुम्ही सुटा-बुटात आला नाहीत तर मोदींचे भाई बनूच शकणार नाहीत, अशी टीका राहुल यांनी केली आहे. मध्य प्रदेशमधील दौऱ्याला सुरुवात केली तेव्हा ते बोलत होते. या पहिल्याच सभेत त्यांनी मोदींवर हल्ल केला. पंतप्रधानांच्या ह्रदयात शोषित व महिलांसाठी स्थान नाही. मात्र त्यांच्या ह्रदयात फक्त उद्योजकांनाच स्थान आहे. ते कधीच शेतकरी आणि कामगारांचा उल्लेख ‘भाई’म्हणून करत नाही करणार नाहीत. गरिबांना ते ‘भाई’म्हटल्याचे कधी कोणी ऐकले का?, असा प्रश्न त्यांनी विचारला. राहुल गांधी यांनी दातिया येथील पितांबरा शक्तिपीठात देवीचे दर्शन घेतले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गणेश चतुर्थीच्या वेळी देवघरात दुर्वा ठेवा, गणपती सर्व अडथळे दूर करेल

Ganesh Chaturthi 2025 स्वादिष्ट प्रसाद श्रीखंड, गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी

गणपती आणि हरवलेल्या शंखाची कहाणी

पावसाळ्यात रस्त्यावरील हे 7 पदार्थ खाऊ नका, कारण जाणून घ्या

त्वचा मऊ करण्यासाठी कोरफडीत मिसळा या 3 गोष्टी

पुढील लेख
Show comments