Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राहुल गांधींचा संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ

राहुल गांधींचा संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ
, सोमवार, 26 जुलै 2021 (13:10 IST)
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सुद्धा (26 जुलै 2021) गदारोळामुळे कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आल्या आहेत.

आज संसदेचं कामकाज सुरू होण्याआधीच काँग्रेस नेते राहुल गांधी ट्रॅक्टर घेऊन संसदभवन परिसरात आले.
शेती संदर्भात करण्यात आलेल्या 3 कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि दिल्लीच्या सीमांवर गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी यांनी हे पाऊल उचलल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.
 
"नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांचा हक्क हिरावून घेत आहे, तसंच सरकारने आणलेले 3 कृषी कायदे मुठभर उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. ते त्यांना मागे घ्यावे लागतील," असं राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं आहे.
 
 
दुसरीकडे शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी दिल्लीतल्या जतरमंतरमध्ये प्रतिकात्मक संसद भरवली आहे. शेतकरीविरोधी कायदे संपवा, अश त्यांनी मागणी आहे.तिकडे संसद भवन परिसरात अकाली दलाच्या खासदारांनी त्यांचं आंदोलन सुरूच ठेवलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बी.एस. येडियुरप्पा:कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची राजीनाम्याची घोषणा