Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल गांधींचा मोठा आरोप महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात तफावत, मतदार यादीतून अल्पसंख्याकांची नावे वगळली

Rahul Gandhi
, शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2025 (14:29 IST)
Rahul Gandhi news : काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाली आहे. मतदार यादीतून अल्पसंख्याकांची नावे वगळण्यात आली आहे. यासोबतच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार आणि मतदान याद्यांमध्ये अनियमितता आढळून आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. आमच्या टीमने यावर काम केले आहे. यामध्ये आम्हाला अनेक अनियमितता आढळल्या आहे. अल्पसंख्याकांची मते मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. असे देखील ते म्हणाले.
ALSO READ: नागपूरमध्ये लाच घेतांना महिला पोलीस अधिकारीला एसीबीने रंगेहात पकडले
काँग्रेस खासदार राहुल गांधी महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्ष निवडणूक आयोगाकडे मतदार यादीची मागणी करत आहे. महाराष्ट्राची मतदार यादीही आम्हाला उपलब्ध करून दिली जात नाही.
 ALSO READ: नाशिकमध्ये इनोव्हा कारने एका लहान मुलाला चिरडले, पोटच्या गोळ्याला मृत पाहून आई पडली बेशुद्ध
तसेच राहुल गांधी म्हणाले, '2019 च्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान 5 वर्षांत 32 लाख मतदार जोडले गेले. लोकसभा 2024 आणि विधानसभा निवडणुकांमधील 5 महिन्यांच्या कालावधीत 39 लाख मतदारांची भर पडली. प्रश्न असा आहे की हे 39 लाख मतदार कोण आहे? हे हिमाचल प्रदेशातील एकूण मतदारांइतके आहे. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात राज्यातील एकूण मतदारसंख्येपेक्षा जास्त मतदार का आहे? महाराष्ट्रात अचानक मतदार निर्माण झाले आहे.

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपूरमध्ये लाच घेतांना महिला पोलीस अधिकारीला एसीबीने रंगेहात पकडले