Publish Date: Sat, 21 Jul 2018 (09:05 IST)
Updated Date: Sat, 21 Jul 2018 (09:09 IST)
आपल्या भाषणादरम्यान, राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. त्यानंतर आता जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेकडून राहुलचे समर्थन करण्यात आलेय. राहुल गांधी हे खऱ्या अर्थाने राजकीय झालेत. त्यांनी मोदी यांना जोरदार झटका दिलाय. ही जादूची झप्पी नव्हती तर ती मोदींसाठी मोठा धक्का आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलेय.
लोकसभेत काँग्रेसकडून प्रश्न नाहीत तर देशातून लोक मोदींना प्रश्न विचारत आहेत. त्यांना जाब विचारत आहेत. राहुल गांधी यांनी जे केले ते योग्य आहे. राहुल एक परिपक्व नेता पाहायला मिळालेत, असे संजय राऊत म्हणालेत.