राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आता राज्याच्या सत्तेची कमान भजनलाल शर्मा यांच्या हातात असेल. भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्माया नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. यापूर्वी पक्षाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, सरोज पांडे आणि विनोद तावडे यांना निरीक्षक म्हणून जयपूरला पाठवले होते.
त्यानंतर पक्षाने राज्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली. राज्यात मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेली सस्पेंस संपवून विधीमंडळ पक्षनेते निवडण्यासाठी सर्वांची संमती मिळवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. यानंतर मंगळवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांची निवड करण्यात आली.
यापूर्वी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली होती. निवडणुकीतील विजयानंतर वसुंधरा यांनी पक्षाच्या अनेक आमदारांना डिनर पार्टी दिली होती, याला दबावाचे राजकारण म्हणून पाहिले जात होते. मात्र, नड्डा यांची भेट घेतल्यानंतर वसुंधरा यांचा सूर बदलल्याचे दिसले आणि त्यांनी स्वतःला पक्षाची शिस्तप्रिय कार्यकर्ता असल्याचे सांगितले.