कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे हा केंद्र सरकारच्या पातळीवरील विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकरी संप देशपातळीवर नेणार आहे. या संदर्भात 16 जून रोजी दिल्लीत देशातील शेतकरी नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तिथे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आयेजित पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या धर्तीवर मुख्यमंत्री राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करत आहेत. मात्र, केंद्रीय कृषी मूल्य आयोग हे राजकारण्यांच्या हातातील बाहुले आहे, असा घणाघात करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारचा समाचार घेतला. तसेच शेतकऱ्यांचे आंदोलन आणि संप देशपातळीवर नेण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.