राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. ते 64 वर्षांचे होते. त्यांना उपचारासाठी सिंगापूर इथल्या दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. उपचादारम्यान त्यांचं निधन झालं आहे. 2013 मध्ये किडनीचा आजार झाल्यानंतर त्यांच्यावर दुबईत उपचार करण्यात आले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी पुन्हा राजकीय कामांना सुरुवात केली होती.
उत्तर प्रदेशच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अमर सिंह यांचं नाव होतं. अमर सिंह यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात १९९६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर झाली होती. समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांची राजकीय सक्रीयता थोडी कमी झाली होती.
बिग बी अमिताभ बच्चन यांचे आणि त्यांचेही चांगले संबंध होते. मात्र या दोघांमध्ये काही मतभेदही झाले होते. ज्यानंतर यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांची माफीही मागितली होती.आजारी पडण्यापूर्वी ते भाजपच्या अतिशय जवळही आले होते.