कर्नाटकातील कुमटा तालुक्यातील एका घरात अजगर दिसला, ज्यामुळे घरातील सदस्य घाबरले, मात्र हा अजगर सामान्य अजगर नसून दुर्मिळ पांढरा अजगर (Rare White Python Spotted in kumta) होता. सुरुवातीला लोकांना ते ओळखता आले नाही, पण नंतर लोकांनी सापांबद्दल माहिती असलेल्या पवन नायकला फोन केला, त्यांनी लोकांना या सापाविषयी माहिती दिली. पवनने सांगितले की, ही सापांची वेगळी प्रजाती नाही, परंतु अशा सापांमध्ये मेलेनिन ग्रंथी नसते. यामुळे त्यांचा रंग पांढरा आहे. या अजगराची घरातून सुटका करून जंगलात सोडण्यात आले.