NDTVची संपूर्ण मालकी आता अदानी समुहाकडे आली आहे. सेबीला आता त्या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी 29 नोव्हेंबरला कंपनी सेक्रेटरी परिणीता भुतानी यांनी सेबीला पत्र लिहिलं.
त्यात एनडीटीव्हीची होल्डीग कंपनी असलेल्या आरआरपीआरएचच्या संचालक मंडळातून राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांनी राजीनामा दिल्याचं कळवण्यात आलं आहे. परिमाणी एनडीटीव्हीचे प्रमोटर राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांची आता कंपनीवरची मालकी संपुष्टात आली आहे.
त्यांच्या राजीनाम्यानंतर अदानी समुहाकडून सुदिप्ता भाट्टाचार्य, संजय पुगलिया, सेंथिल चेंगलवरयान यांची तात्काळ आरआरपीआरएचच्या डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यापैकी संजयु पुगलिया ज्येष्ठ पत्रकार आहेत. टीव्ही क्षेत्रात काम करण्याचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. वेगवेगळ्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या संपादकपदी आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांनी काम केलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एनडीटीव्हीमध्ये 30 टक्के शेअर घेऊन हा समूह विकत घेत असल्याची घोषणा केली होती.
2020 पासून एका प्रकरणात सेबीनं राधिक रॉय आणि प्रणव रॉय यांच्यावर शेअर्सच्या खरेदी-विक्रीची बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले शेअर्स त्यांना वर्ग करता येणार नसल्याचं त्यांनी शेअर मार्केट नियामकांना कळवलं होतं.
सेबीच्या या ऑर्डरनुसार 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांच्यावर ही बंदी होती. ती संपताच त्यांनी आरआरपीआरएचच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
NDTVच्या शेअर्सवर अदानी समुहाने असा मिळवला ताबा
अदानी समुहाने एनडीटीव्हीच्या शेअर्सचा मोठा हिस्सा विकत घेतला आहे. अदानी समुहाने एनडीटीव्हीमध्ये एक मोठा भाग खरेदी केला आहे आणि आता अजून 26% शेअर्स खरेदी करण्यासाठी एक खुली ऑफर जाहीर केली होती.
प्रणय रॉय, राधिका रॉय आणि NDTV व्यवस्थापनाच्या इच्छेविरुद्ध अदानी समूहने कंपनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. याला होस्टाईल टेकओव्हर असं म्हणतात.
यातील कोणतीही बाब योग्य असू शकते. पहिल्या दोहोंमध्ये सांगण्याच्या पद्धतीत फरक आहे किंवा तांत्रिकदृष्ट्या अर्ध्याहून अधिक हिस्सेदारी न घेता कंपनी विकत घेतली, असं म्हणणं बरोबर नाही, कदाचित.
पण दुसरी गोष्ट खरी मानली, जसं NDTVच्या सीईओ सुपर्णा सिंह यांनी आपल्या सहकाऱ्यांना मेल लिहून सांगितले आहे, तर हे चित्र काहीसं वेगळं दिसतं.
23 ऑगस्टपूर्वी NDTVच्या प्रमोटर्सकडे (मालक) किती शेअर्स होते?
अदानी यांची घोषणा होण्यापूर्वी NDTV च्या प्रमोटर्सकडील शेअर्स खालीलप्रमाणे होते.
प्रणय रॉय : 15.94% राधिका रॉय : 16.32%
RRPR (प्रणय आणि राधिका रॉय यांच्या संयुक्त मालकीची कंपनी) : 29.18% NDTV च्या प्रमोटर्सकडील एकूण वाटा : 61.45%
राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांच्याकडे व्यक्तिगतरित्या 16+16 म्हणजेच 32 टक्के शेअर्स होते.
23 ऑगस्ट रोजी काय घडलं?
23 ऑगस्ट रोजी अदानी एंटरप्राईजेसच्या मालकीच्या AMG मीडिया नेटवर्क्सने विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडचं (VCPL) अधिग्रहण केलं.
NDTV ने 2009 मध्ये विश्वप्रधान कंपनीकडून 350 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जातील करारानुसार, VCPL या कर्जाचं रुपांतर RRPR च्या 99.99 टक्के इक्विटीमध्ये करू शकत होतं, असं काही बातम्यांमध्ये छापून आलं होतं.
23 ऑगस्ट 2022 ला VCPL ने त्यांच्या या अधिकाराचा वापर केला. यामार्फत त्यांना RRPR च्या मालकीचा NDTV मधील 29% टक्के वाटा आपल्या नावे करता आला.
Published By- Priya Dixit