Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Road Accident: ट्रॅक्टर उलटून पाच जणांचा मृत्यू,जबलपूरची घटना

Webdunia
सोमवार, 6 मे 2024 (16:26 IST)
मध्य प्रदेशातील जबलपूर मध्ये भरधाव वेगात जाणारा ट्रॅक्टर उलटून पाच जणांचा मृत्यू झाला असून या मृतांमध्ये चार अल्पवयीन आणि एका तरुणाचा समावेश आहे. 

सदर घटना जबलपूरच्या चरगवां पोलीस ठाण्यांतर्गत तिनेटा गावात घडली आहे. भरधाव वेगाने जाणारा ट्रॅक्टर उलटून पाच जणांचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहे. भरधाव वेगात गाडी चालवल्याने ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटले आणि पलटी झाला. सर्वजण ट्रॅक्टरखाली गाडले गेले. 

धर्मेंद्र यादव हे ट्रॅक्टर चालवत होते. त्यांचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. धर्मेंद्र यांच्या घरी त्यांच्या बहिणेचे लग्न होते. सोमवारी वरात येणार होती. धर्मेंद्र हे ट्रॅक्टर घेऊन पाण्या साठी टँकर आणायला जात असताना रस्त्यात अपघात झाला. अपघातात पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर दोन मुलं जखमी झाली.
 
सर्वांना वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजार आणि जखमींना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.
 
या घटनेवर शोक व्यक्त करताना, राज्याचे प्रमुख सीएम मोहन यादव यांनी ट्विटरवर लिहिले की, टिनेटा देवरी येथे ट्रॅक्टर उलटल्याने 5 मुलांचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. दिवंगत आत्म्यांना त्यांच्या चरणी शांती लाभो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अपघातात जखमी झालेल्या दोन मुलांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वांच्या लवकर बरे होण्यासाठी मी बाबा महाकालकडे प्रार्थना करतो. मृत मुलांच्या कुटुंबीयांना 50-50 हजार रुपये आणि जखमींना 10-10 हजार रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून करण्यात येत आहे.  
 
Edited By- Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments