चक्रवात पूर्वी
शांत राहा, घाबरू नका आणि अफवांकडे दुर्लक्ष करा
संपर्क क्षेत्रात राहण्यासाठी आपला मोबाईल चार्ज ठेवा, एसएमएस वापरा
मोसमाची माहिती मिळावी यासाठी रेडिओ ऐका, टीव्ही बघा आणि वृत्त पत्र वाचा.
आपले आवश्यक कागद आणि मौल्यवान वस्तू एका जलरोधक पिशवीत ठेवा.
एक आपदा किट तयार असू द्या, ज्यात सुरक्षेसाठी आवश्यक सामान असावं.
आपले घर, बिल्डिंग सुदृढ करा, आवश्यक दुरुस्ती करवा आणि धारदार वस्तू उघड्यात ठेवू नका.
जनावरांना बांधून ठेवू नये.
चक्रवात दरम्यान आणि नंतर
आपण आत असल्यास:
विजेचं मेन स्विच व गॅस सप्लाय लगेच बंद करा आणि दारं- खिडक्या बंध ठेवा.
आपलं घर असुरक्षित असल्यास चक्रवात येण्यापूर्वी सुरक्षित स्थानावर जावं.
रेडिओवर अपडेट्स ऐका.
उकळेलं किंवा क्लोरीनयुक्त पाणी प्या.
केवळ आधिकारिक चेतावणीवर विश्वास ठेवा.
आपण बाहेर असल्यास:
क्षतिग्रस्त इमारतीत जाऊ नये.
तुटलेले विजेचे खांब, तार आणि धारदार वस्तूंपासून वाचा.
लवकर एखाद्या सुरक्षित स्थानावर जावं.
ओडिशा, कोलकता, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, तामिळनाडू, चेन्नई आणि आंध्रप्रदेश येथे तितली चा प्रभाव दिसून येत आहे.