Publish Date: Sat, 07 Apr 2018 (15:51 IST)
Updated Date: Sat, 07 Apr 2018 (15:58 IST)
काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण झाली असून सलमान खानला जोधपूर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे. गेले दोन दिवस सोशल मीडियासह सगळीकडेच सलमान खानला जामीन मिळणार कि नाही याचीच चर्चा होती.