Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

शरद यादव आणि अली अनवर यांची राज्यसभेतून हकालपट्टी

शरद यादव आणि अली अनवर यांची राज्यसभेतून हकालपट्टी
, मंगळवार, 5 डिसेंबर 2017 (09:29 IST)

जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद यादव आणि अली अनवर यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. दोघांवरही जेडीयूने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत राज्यसभा सचिवालयाकडे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात तक्रार केली होती. या तक्रारीवरुन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी दोन्ही नेत्यांचं सदस्यत्व रद्द केलं. शरद यादव यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी होता. तर अली अनवर यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ बाकी होता. 

गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि शरद यादव यांच्यात अंतर्गत कलह शिगेला पोहचला होता. नितीश कुमारांनी बिहारमधील लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबतचं महागठबंधनचं सरकार बरखास्त करत, भाजपशी हातमिळवणी करुन पुन: सत्ता स्थापन केली. याला शरद यादव यांनी तीव्र विरोध केला होता.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोन्याचे भाव 300 रुपयांनी घसरले