Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोरोनानंतर 'या' रोगाचे थैमान

कोरोनानंतर 'या' रोगाचे थैमान
, गुरूवार, 5 मे 2022 (16:11 IST)
शिगेला बॅक्टेरिया: केरळच्या कासारगोड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटनेमागे शिगेला बॅक्टेरिया कारणीभूत असल्याचे मानले जाते. नुकतेच ढाब्यावरचे जेवण खाल्ल्याने 58 जण आजारी पडले आणि एका मुलीचा मृत्यू झाला. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व संक्रमित लोकांपैकी पाच रुग्णांचे नमुने कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते आणि त्यातील तिघांच्या अहवालात शिगेला बॅक्टेरियाच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे.
 
त्यामुळे हा जीवाणूंचा प्रादुर्भाव असल्याचे मानले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जीवाणूंचा प्रसार रोखण्यासाठी आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता पावले उचलली जात आहेत.
 
या अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकारी सामान्य लोकांमध्ये आणि ढाब्यांच्या मालकांमध्ये जीवाणूंचा प्रसार कसा होतो, संसर्ग कसा टाळता येईल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत जनजागृती करण्याचे काम करत आहेत.
 
ते म्हणाले की, आरोग्य अधिकार्‍यांकडून विविध भोजनालये आणि रेस्टॉरंटची तपासणी केली जात आहे. याशिवाय स्थानिक पाणीपुरवठ्याचीही चौकशी करण्यात येत आहे. ते म्हणाले की, जिवाणू प्रामुख्याने दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छता हा महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय अन्न योग्य प्रकारे शिजवल्याने बॅक्टेरिया देखील नष्ट होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरी बसल्या काही मिनिटांत आधार कार्ड अपडेट करा, प्रक्रिया जाणून घ्या