Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक !'तू नाही तर मी ही नाही ' होणाऱ्या पत्नीच्या मृत्यू नंतर तणावात येऊन जवानाची आत्महत्या

Shocking! A soldier commits suicide due to stress after the death of his wife NAtional News In Marathi Webdunia Marathi
, मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (14:51 IST)
राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात 24 वर्षीय सैनिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.होणाऱ्या पत्नीच्या आत्महत्येनंतर तणावात येऊन दोन दिवसांनी सैनिकाने सोमवारी हे पाऊल उचलले.कोटा ग्रामीणमधील चेचट पोलीस स्टेशनचे स्टेशन प्रभारींनी सांगितले की, पप्पू लाल यादव हे कुमाऊँ रेजिमेंटचे होते आणि ते डेहराडूनमध्ये तैनात होते.आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली.
 
जवानाच्या भावाच्या वक्तव्यानुसार, त्यांनी सांगितले की, पप्पू त्याच्या भावी पत्नीने चित्तौडगड जिल्ह्यात आत्महत्या केल्यामुळे निराश होता. पोलिसांनी सांगितले की, सैनिकाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावी पत्नीच्या आठवणीत स्टेटस अपडेट केले होते, ज्यामध्ये असे लिहिले होते की 'तुम नही,तो मैं नहीं' (जर तुम्ही नाही तर मी ही नाही).
 
भाऊ  म्हणाला की तो सुमारे 15-20 दिवसांपूर्वी रजेवर आला होता आणि अलीकडेच चित्तौडगड जिल्ह्यातील मुलीशी त्याचे लग्न ठरले होते त्याची भावी पत्नी ही बेसिक स्कूल ट्रेनिंग कोर्स(बीएसटीसी) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. दोघांचे लग्न दिवाळीनंतर होणार होते. पण 4 सप्टेंबर रोजी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.तिच्या आत्महत्येचे कारण तपासले जात आहे.त्या तणावाखाली येऊन या जवानाने असं केल्याचे सांगितले जात आहे. प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोटांनी भरलेले तीन ट्रक धडकले, मध्ये अडकली महिला शिपाई, पाय निकामी झाले