अनेकदा प्रवास करताना झोप लागते आणि हवे ते स्टेशन मागे रहाते त्यामुळे अनेकदा दुसऱ्याच स्टेशनवर उतरावे लागते मात्र यावर एक नामी उपाय रेल्वेने काढला आहे. कारण रेल्वेने वेकअप कॉलची सुविधा सुरु केली आहे.
मोबाईलवरुन 139 हा नंबर डायल करा. तुम्हाला समोरुन काही सूचना दिल्या जातील. त्यानुसार तुम्ही तुमच्या तिकीटाचा पीएनआर नंबर टाईप करा. स्टेशनचे नाव टाका आणि झोपून जायचे आहे. तुम्हाला ज्या रेल्वे स्थानकात उतरायचे आहे ते स्थानक येण्याच्या 30 मिनिटे आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अॅलर्टचा कॉल येईल आणि स्टेशन सांगितले जाणार आहे.139 नंबरवर आवश्यक माहिती मिळाल्यानंतर सिस्टीम तुमची ट्रेन सध्या कुठे आहे ते चेक करेल. त्यानुसार स्टेशन येण्याच्या अर्धातास आधी तुम्हाला सूचित केले जाईल.