सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करायला सरकारही अनेक प्रयत्न करत आहे. आता या जोडीला सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलले जाणार आहे. तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी 1 सप्टेंबर 2018 पासून एक टोल फ्री क्रमांक दिला जाणार आहे. 1800-11-2356 या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास तंबाखूचं व्यसन सोडण्याचे मार्ग सांगितले जाणार आहेत. टोल फ्री नंबरची अधिसूचना आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. लवकरच भारतील प्रादेशिक भाषांमध्ये, त्यांच्या मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. 1 सप्टेंबरपासून हा संदेश लागू होणार आहे.
जीएटीएस-2, 2016-17 च्या अहवालानुसार, 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांमध्ये तंबाखूंचं
सेवन करणार्यांमध्ये 61.9 % लोकं सिगारेट, 53.8% बीडी आणि 46.2 % लोकं धुर विरहित तंबाखूचं सेवन करतात.